
होळी सणानिमित्त मध्य रेल्वेने 48 अतिरिक्त गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडय़ांमुळे कोकण, पुणे, नाशिक, नगर, भुसावळ आदी ठिकाणी जाणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई-मऊ, दानापूर, बनारस, समस्तीपूर, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम तसेच पुणे-गाजीपूर, दानापूर, हजरत निजामुद्दीन या मार्गांवर अतिरिक्त गाडय़ा धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (6 सेवा), लोकमान्य टिळक टर्मिनस-मऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (8 सेवा), लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (4 सेवा), पुणे-दानापूर-पुणे द्विसाप्ताहिक विशेष (6 सेवा), पुणे-गाजीपूर शहर-पुणे द्विसाप्ताहिक विशेष (8 फेऱया), लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (4 फेऱया), पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष (4 सेवा), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कन्याकुमारी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष (4 सेवा), लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम उत्तर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (4 सेवा) अशा अतिरिक्त गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.