ऑलिम्पिकपटूंवर कोटींची माया; ‘मिशन गोल्ड’साठी हिंदुस्थानी खेळाडूंवर 470 कोटींचा खर्च

पॅरिसमध्ये सध्या ऑलिम्पिकची लगीनघाई सुरू असून क्रीडाविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी आता जेमतेम नऊ दिवस उरले आहेत. 26 जुलैपासून सुरू होणाऱया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 118 खेळाडूंचे पथक काwशल्य पणाला लावणार आहे. ‘मिशन ऑलिम्पिक’च्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी खेळाडूंच्या ‘मिशन गोल्ड’ तयारीसाठी पेंद्र सरकारने तब्बल 470 कोटी रुपये खर्च करत खेळाडूंना आपली माया दाखवली आहे. यामध्ये ट्रक अॅण्ड फिल्डच्या खेळाडूंवर म्हणजे अॅथलिटवर सर्वाधिक 96 कोटी 8 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मिशन ऑलिम्पिक सेलच्या (एमओसी) अधिकृत आकडेवारीनुसार 16 खेळांतील खेळाडूंच्या तयारीवर शासनाने एकूण 470 कोटी रूपये खर्च केले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या नेतृत्वाखाली 28 अॅथलिटचा संघ हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. गतवर्षी हिंदुस्थानने एका सुवर्णासह सात पदकांची कमाई केली होती. यावेळी यापेक्षा अधिक पदके जिंकून हिंदुस्थानी खेळाडू नवा इतिहास रचतील, अशी देशवासीयांना अपेक्षा आहे.

■ टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी शासनाने सर्वाधिक 5 कोटी 72 लाख रुपये खर्च केले आहेत. नीरजचे परदेशी प्रशिक्षक डॉ. क्लॉस बार्टोनिट्ज यांची फी, युरोपातील ऑलिम्पिक शिबीर आणि युरोप, अमेरिका व दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी हा खर्च झालेला आहे.

मिशन ऑलिम्पिकसाठी खेळनिहाय खर्च
अॅथलेटिक्स – 96 कोटी 8 लाख
बॅडमिंटन – 72 कोटी 2 लाख
बॉक्सिंग – 60 कोटी 93 लाख
नेमबाजी – 60 कोटी 42 लाख
हॉकी टीम – 41 कोटी 81 लाख
तिरंदाजी – 39 कोटी 18 लाख
कुस्ती – 37 कोटी 80 लाख
वेटलिफ्टिंग – 26 कोटी 98 लाख
टेबल टेनिस – 12 कोटी 92 लाख
ज्युदो – 6 कोटी 3 लाख
नौकानयन – 3 कोटी 89 लाख
पाल नौकानयन – 3 कोटी 78 लाख
जलतरण – 3 कोटी 9 लाख
गोल्फ – 1 कोटी 74 लाख
टेनिस – 1 कोटी 67 लाख
घोडेस्वारी – 95 लाख