बदनापूर विधानसभा मतदारसंघात छाननीअंती 40 उमेदवारांचे 45 अर्ज

छाननीअंती 40 उमेदवारांचे 45 अर्ज कायम राहिले असून, 30 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. 4 नोव्हेंबर ही तारीख अर्ज मागे घेण्याची असल्यामुळे कोण उमेदवार रिंगणात राहतात. याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सुमित्रा सुत्रावे व सह निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी डमरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अर्जाच्या छाननीस सुरुवात केली.

छाननीअंती 40 उमेदवारांचे 45 अर्ज वैध ठरले तर 30 उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. विशेष म्हणजे 12 उमेदवारांनी एक- एक उमेदवारी अर्ज भरलेला होता, त्यातही त्रुटी आढळल्याने त्यांचे अर्ज बाद झाल्याने त्यांना निवडणुका लढण्याची आशा सोडून द्यावी लागणार आहे.