अवयवदानासाठी 42 दिवसांची रजा

केंद्र सरकारने अवयवदानावर सरकारी कर्मचाऱ्यांना 42 दिवसांची विशेष कॅज्युअल रजा देण्याची तरतुद केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत याबाबतची माहिती दिली. ही रजा शस्त्रक्रियेच्या प्रकारावर अवलंबून राहाणार नाही आणि सरकारी डॉक्टरांच्या शिफारशीनुसार जास्तीत जास्त 42 दिवस रजा मिळू शकते. रजा सहसा रुग्णालयात दाखल होण्याच्या दिवशी सुरू होईल.