400 कोटींच्या शेणाची परदेशात निर्यात

गायीच्या शेणाला परदेशात मोठी मागणी आहे. हिंदुस्थानने 2024 मध्ये 400 कोटी रुपयांचे शेणाचे खत परदेशात विकले आहे. 2024 मध्ये गायीचे शेण 125 कोटी रुपये, शेणापासून बनवलेले खत 173.57 कोटी रुपये, तर कंपोस्ट खत 88.02 कोटी रुपये किमतीचे निर्यात करण्यात आले आहे. कुवेत आणि अरब देशांमध्ये गायीच्या शेणाला मोठी मागणी आहे. कुवेतमध्ये खत म्हणून शेणाचा वापर खजूर पिकांसाठी केला जातो. हिंदुस्थान आता मसाले, चहासोबतच गायीचे शेण, गोमूत्रसुद्धा विक्री करत आहे.