संगीतकाराच्या स्टुडिओमधून 40 लाखांची चोरी

बॉलीवूड संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या गोरेगाव येथील स्टुडिओमधून सुमारे 40 लाखांची कॅश घेऊन ऑफिस बॉयने पळ काढला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत. तक्रारदार हे दोन वर्षांपासून संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला आहे. प्रितम यांच्या स्टुडिओमध्ये कामाला असलेला तरुण गेल्या आठवडय़ात एका निर्मात्याकडून 40 लाख रुपये घेऊन आला होता. ती रक्कम तक्रारदार याने बॅगेत ठेवली होती. काही वेळाने त्यांना ती बॅग दिसली नाही. चौकशी केल्यावर ती बॅग एक जण घेऊन गेल्याचे समजले.