इस्रायलच्या हल्ल्यात गाझापट्टीत 40 जणांचा मृत्यू; नऊ महिन्यांत 37 हजार ठार, 86 हजार जखमी

7 ऑक्टोबर 2023 पासून म्हणजेच गेल्या नऊ महिन्यांपासून इस्रायल-हमास युद्ध सुरू आहे. यादरम्यान इस्रायलच्या सैन्यांनी गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 224 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या नऊ महिन्यांत 37 हजार 834 जणांचा मृत्यू झाला असून, 86 हजार 858 जण जखमी झाले आहेत. अनेक राष्ट्रांनी या युद्धात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र, दोन्ही राष्ट्रांनी माघार घेतली नाही.

युक्रेन-रशिया या राष्ट्रात युद्धाचा भडका उडालेला असताना इस्रायल- हमासचा वाद शांत झालेला नाही. इस्रायल हा देश आपल्या शत्रू राष्ट्रांनी घेरला असून, आतापर्यंत अनेक वेळा हल्ले झाले आहेत. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ले केले होते. त्यानंतर इस्रायलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली होती. हा संघर्ष अजूनही सुरूच असून, युद्धविराम कधी होईल याकडे लक्ष लागले आहे.