येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहे. 2024 च्या विधानसभेच्या रिंगणात 360 महिला उमेदवारांची संख्या आहे. 2019 च्या तुलनेत ही संख्या वाढली आहे. यावेळी 236 जणींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. 2024 च्या निवडणुकीत अपक्ष महिला उमेदवार संख्या दुपटीने वाढली आहेत. राज्यातील 288 मतदारसंघात भाजपने 17, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 10, शिंदे गटाने 7, अजित पवार गटाने 5, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 11 तर काँग्रेसने 8 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर राज्यातील केवळ पुण्यातील पार्वती मतदारसंघात दोन महिला उमेदवार आमनेसामने आहेत. भाजपकडून माधुरी मिसाळ, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनीताई कदम रिंगणात आहेत.
शिवसेनेच्या रणरागिनी : ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), प्रवीणा मोरजकर (कुर्ला), श्रद्धा जाधव (वडाळा), लीना गरड (पनवेल), स्नेहल जगताप (महाड), अनुराधा नागवडे (श्रीगोंदा), जयश्री महाजन (जळगाव शहर), वैशाली सूर्यवंशी (पाचोरा), जयश्री शेळके (बुलढाणा), रूपाली पाटील (हिंगोली).