35 वर्षीय महिलेचा 80 वर्षांच्या वृद्धाशी विवाह

एका 35 वर्षीय महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याचे कारण म्हणजे ती 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीशी लग्न करणार आहे. ही बाब अनोखी वाटत असली तरी परदेशात मात्र सामान्य होत चालली आहे. अमेरिकेतील विस्कोंसिनमध्ये राहणारी 35 वर्षीय टिफनी तिच्यापेक्षा 45 वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहे. टिफनीच्या या निर्णयानंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली. ‘‘माझा प्रियकर 80 वर्षांचा असला तरी तो माझ्यासाठी खूप प्रिय आहे,’’ असे टिफनी सांगते. तिने यापूर्वी प्रियकर म्हणून वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. टिफनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या या लग्नावरून कुटुंबीय नाराज असल्याचे म्हटले.