इस्त्रायलचा गाझावर हवाई हल्ला, 34 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश

इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझाला टार्गेट केले. विस्थापित पॅलेस्टिनींना आश्रय दिलेल्या पाच मजली इमारतीवर मंगळवारी सकाळी इस्रायलने हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 34 जणांचा मत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने घटनेची पुष्टी केली आहे.

मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली सीमेजवळील बीट लाहिया शहरात झालेल्या हल्ल्यात 20 लोक गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायलचे सैन्य गाझा पट्टीमध्ये तीन आठवड्यांहून अधिक काळ मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे. गाझामध्ये पुन्हा संघटित झालेल्या हमास दहशतवाद्यांवर हल्ले करत असल्याचे सांगत महिला आणि मुलांना लक्ष्य करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून विस्थापित लोकांसाठी असलेल्या आश्रयस्थानांवर इस्त्रायली सैन्य वारंवार हल्ला करत आहे. पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना लक्ष्य करून अचूक हल्ले केले जात आहेत. मात्र या हल्ल्यात बहुतांश वेळा महिला आणि मुलांचा मृत्यू झाला आहे.