पळती झाडे पाहूया… मामाच्या गावाला जाऊया! उन्हाळी सुट्टीनिमित्त 332 स्पेशल ट्रेन धावणार

उन्हाळी सुट्टी कधी एकदाची लागतेय अन् गावाला जायला मिळते, असे अनेकांना वाटत आहे. उन्हाळी सुट्टीकडे अनेकांचे डोळे लागले आहे. महापुंभ मेळा आणि होळीनंतर भारतीय रेल्वेने उन्हाळी सुट्टी (समर व्हेकेशन) साठी विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे झोनने उन्हाळी विशेष ट्रेनची माहिती दिली असून मुंबई विभागातील वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनहून 332 समर स्पेशल ट्रेन धावणार आहेत. या ट्रेन मुंबई-नागपूर, मुंबई-करमाली, मुंबई-तिरुवनंतपुरम, पुणे-नागपूर, दौंड-कलबुर्गीसह अन्य स्टेशनवर चालवल्या जातील. सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी ही गाडी साप्ताहिक विशेष गाडी आहे. प्रत्येक मंगळवार आणि रविवारी सीएसएमटीहून रवाना होईल.