रेल्वेत 32 हजार जागांसाठी भरती

रेल्वे विभागात ग्रुप डी पदांच्या जवळपास 32 हजार जागांवर भरती करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेने आरआरबी ग्रुप डीच्या 32 हजार जागांसाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी केले आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या भरतीत पॉइंट्समन, सहायक, ट्रक मेंटेनर, सहायक लोको शेड, सहायक संचालन, सहायक टीएल, एसी अशा पदांवर भरती केली जाणार आहे. उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांपर्यंत असायला हवे.