सुधारित आयटीआरसाठी 31 डिसेंबरची डेडलाइन

आयकर  प्राप्तीकर विभागाने हिंदुस्थानातील नागरिकांना परदेशात जी मालमत्ता आहे. ती जाहीर करून योग्य प्रकारे आयटीआर भरण्याचे आवाहन केले आहे. जर चुकीचा आयटीआर भरला असेल तर विवरणपत्रात (रिटर्न) सुधारणा करणे आवश्यक आहे. हे सर्व 31 डिसेंबर 2024 पर्यंत करणे आवश्यक आहे. जर दिलेल्या कालावधीत सुधारित आयटीआर भरला नाही तर करदात्यांना 10 लाख रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

सर्व नागरिकांना परदेशातील संपत्ती जाहीर करणे आवश्यक आहे. यामध्ये रियल इस्टेट, बँक खाती, शेअर्स, विमा पॉलिसी किंवा अन्य कोणतीही आर्थिक मालमत्ता असेल तर तिची माहिती देणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आली आहेत. यात परकीय मालमत्ता आणि उत्पन्नाचा तपशील देण्यात आला आहे. करदात्यांनी शेडय़ूल फॉरेन असेट्स (शेडयुल एफए) भरणे आवश्यक आहे.