दहशतवादाचे गुजरात कनेक्शन; मुंद्रा बंदरात पकडलेल्या ड्रग्जचा पहलगाम हल्ल्याशी संबंध! एनआयएची सुप्रीम कोर्टात कबुली

गुजरातमधील अदानीच्या खासगी मुंद्रा बंदरात पकडलेल्या 21 हजार कोटी रुपयांच्या तीन हजार किलो ड्रग्जचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

अदानी बंदराचा अफगाणिस्तान मार्ग

मुंद्रा बंदर हे गुजरातमधील कच्छ जिह्यात आहे. हे भारतातील पहिले खासगी बंदर आहे. जे अदानी पोर्ट्स व स्पेशल इकॉनॉमिक झोन यांच्या मालकीचे आहे. या बंदरात आतापर्यंत हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हे ड्रग्ज या बंदरात येण्याचा मार्ग अफगाणिस्तानातून सुरू होत असल्याचे याआधीही समोर आले आहे.