
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागातून यंदा 3 लाख 58 हजार विद्यार्थी दहावीची (एसएससी) परीक्षा देणार आहेत. शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या परीक्षार्थींची संख्या 11 हजारांनी वाढली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत दहावीची परीक्षा दोन आठवडे आधीच सुरू होणार आहे. 17 मार्चपर्यंत परीक्षा चालेल.
या परीक्षेसाठी मुंबई विभागातून 3 लाख 58 हजार 854 विद्यार्थी बसणार आहेत. सर्वाधिक म्हणजे 1 लाख 21 हजार 244 विद्यार्थी ठाणे जिह्यातील आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थीसंख्येत 11 हजारांची वाढ झाली आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, महसूल विभाग, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षणाधिकारी एकत्रितपणे हे अभियान राबवतील. प्रत्येक पेंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे पथक असेल. त्याशिवाय भरारी पथकेही पेंद्रांना भेट देऊन पाहणी करतील.
जिल्हानिहाय विद्यार्थी
- ठाणेः 1,21,244
- पालघरः 67,000
- मुंबई पूर्वः 57,469
- मुंबई उत्तरः 46,806
- रायगडः 37,182
- दक्षिण मुंबईः 29,153
- एकूणः 3,58,854