घरात ठेवलेल्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर लागलेल्या आगीत तीन मुली जिवंत जळाल्या. आस्था (10), नैना (7) आणि आराध्या (5) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. या आगीत वडीलही भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. नोएडा सेक्टर-8 येथील जेजे कॉलनीत ही दुर्दैवी घटना घडली. वडिलांनी मुलींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.