हिंदुस्थानी बुद्धिबळाच्या इतिहासात प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकण्याचा पराक्रम महिला आणि पुरुष बुद्धिबळपटूंनी केला आहे. त्यामुळे यो दोन्ही खेळाडूंवर अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) अक्षरशः धनवर्षाव केला आहे. विजेत्या पुरुष आणि महिला खेळाडूंचे कौतुक करताना विजेत्यांना 3 कोटी 20 लाखांची पुरस्कार रक्कम दिली जाणार असल्याची माहिती एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी दिली.
विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच प्रशिक्षक अभिजित कुंटे आणि श्रीनाथ नारायण यांना प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे हिंदुस्थानचे पथक प्रमुख दिव्येंदु बरुआला 10 लाख आणि सहाय्यक प्रशिक्षकांना 7.5 लाखांचे इनाम देऊन गौरविले जाणार असल्याचेही नारंग यांनी सांगितले.