
मणिपूर पोलिसांनी 4 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुलाच्या नावाने मंत्रिपदाचे आश्वासन देऊन आमदारांची फसवणूक करत होते. मणिपूरचे विधानसभा अध्यक्ष थोकचोम सत्यव्रत हे देखील या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती लागवट सुरू झाल्यापासून या फसवणुकीच्या प्रकरणाला सुरूवात झाली. एका अज्ञात व्यक्तीने राज्यातील अनेक आमदारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुलाच्या नावाने फसवले. तुम्हाला 4 कोटी रुपयात मंत्रीपद देतो असे आश्वासन दिले. याबाबात 15 फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
फसवणुकीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ चौकशी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा तपास केला असून 3 जणांची ओळखी पटली आहे. पोलिसांनी आरोपींना 11 मार्च रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास दिल्लीहून इन्फाळला विमानाने आणले आहे. तसेच या चारही आरोपींविरोधात फसवणुकीसाठी कलम 318(4) आणि 319 (2) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.
मणिपूरच्या इन्फाळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी फारूख शेख हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रियांशु पंत (19), उवैश अहमद (19) आणि गौरव नाथ (19) अशी या तीन आरोपींची नावे आहेत.