देशातील 15 ते 49 वयोगटातील 3.3 टक्के महिलांची हिस्टेरेक्टोमी शस्त्रक्रिया; ‘प्रिझर्व्ह द यूटरस’ उपक्रमांतर्गत महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण 

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण नुसार देशात 15 ते 49 वयोगटातील 3.3 टक्के हिंदुस्थानी महिलांनी गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (हिस्टेरेक्टोमी) केली होती. गर्भाशय काढण्याचे सर्वात अधिक प्रमाण आंध्र प्रदेश 8.7 टक्के आणि तेलंगणा 8.2 टक्के इतके दिसून आले. त्या खालोखाल बिहार 6 टक्के आणि गुजरात 4 टक्के इटकर आढळून आले. ईशान्येकडील प्रदेशात 1.2 टक्के सर्वात कमी प्रमाण होते अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. जयदीप टांक यांनी दिली. फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया आणि बायरच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रिझर्व्ह द यूटरस’  उपक्रमांतर्गत मुंबई येथे पार पडलेल्या आरोग्यविषयक बैठकीत ते बोलत होते. बायर फार्मास्युटिकल्सच्या श्वेता राय, फॉगसी संस्थेच्या  जनजागृती समितीचे डॉ. प्रियांकुर रॉय तसेच आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. जयदीप टांक यांनी अनावश्यक हिस्टेरेक्टोमी कमी करण्यासाठी आणि उत्कृष्ट आरोग्य सेवा पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या बांधिलकीवर भर दिला. “आम्ही अनावश्यक हिस्टेरेक्टॉमीज कमी करण्यासाठी पावले उचलली आहे.  गर्भाशयाचे जतन करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा पुढाकार घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हि संस्था संबंधित निषिद्ध आणि विविध स्त्रीरोगविषयक विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी डॉक्टरांना मदत करते अशी माहिती त्यांनी दिली. 2022 मध्ये  ‘प्रिझर्व्ह द यूटरस’ मोहीम सुरू केली असून पुढे महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये या उपक्रमाचा विस्तार झाला असल्याचेही ते म्हणाले.