टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना शनिवार (25 जानेवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. हिंदुस्थानने हा सामना सात विकेटने जिंकला. हिंदुस्थानी संघाला हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे, तर इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. यातच सामन्यादरम्यान चेन्नईचे हवामान कसं असेल, याचा सामन्यावर काही परिणाम होणार का? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याचबद्दल जाणून घेऊ…
कसं असेल हवामान?
हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20 सामन्याच्या हंगामाविषयी बोलायचे झाले तर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी पावसाची अजिबात शक्यता नाही. चेन्नईचे हवामान बहुतांशी उष्ण असते. तापमानाबद्दल बोलायचे तर ते 23 अंश ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.