गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा अक्षरशः कहर सुरू असून रविवारी सुरतमध्ये पहिला संशयित रुग्ण आढळला. झोपडपट्टी भागात राहाणाऱया एका 11 वर्षीय मुलीला खूप ताप आणि उलटय़ा होत असल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. राजकोटमध्ये आणखी एक संशयित रुग्ण आढळला असून दोन्ही मुलांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.