
म्यानमार 2021 मध्ये लष्कराच्या ताब्यात गेल्यापासून तिथे सातत्याने बंडखोर उठाव करत असून गावे ताब्यात घेत आहेत. त्यामुळे म्यानमारमध्ये अस्थैर्य आहे. लोकशाही समर्थक लोकांचे गट लष्कराशी लढत असून या गटांनी अनेक गावे नियंत्रणाखाली आणली आहेत. अशाच एका गटाच्या नियंत्रणात असलेल्या सिंगू शहरातील लेट पान या गावावर लष्कराने हल्ला केला. यात सहा मुलांसह 27 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 30 नागरिक जखमी झाले. म्यानमारमधील ऑनलाइन माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
मंडाले शहराच्या उत्तरेस 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगू शहरातील लेट पान गावावर हा हल्ला करण्यात आला. मंडाले हे म्यानमारमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे, अशी माहिती मंडाले पीपल्स डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्याने दिली.