गणवेशाविना शाळेत जाणाऱ्या पालघरमधील ५८ हजार विद्यार्थ्यांपैकी 26 हजार मुलांना अखेर शाळेचे कपडे मिळाले आहेत. दैनिक ‘सामना’ने मिंधे सरकारवर टीकेची झोड उठवत वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला खडबडून जाग आली आणि तातडीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले आहे. मात्र अजूनही जवळपास 32 हजार मुलांना नव्याकोऱ्या गणवेशाची प्रतीक्षाच असून दिवाळीनंतरच त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते आठवी वर्गातील 1 लाख 66 हजार 992 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत गणवेश शिवून देण्यात येणार होते. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देऊ असा गाजावाजा करणाऱ्या सरकारचा या प्रकारामुळे पर्दाफाश झाला आहे. शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरीसुद्धा गणवेश न मिळाल्याने जुनेच कपडे घालून हजारो विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. दरम्यान गणवेश शिवून तयार असल्याची माहिती महिला आर्थिक महाविकास मंडळाने दिली असली तरी अद्याप कपड्यांना काज, बटन, पॅकिंग व इतर कारणांमुळे
अनेक कपडे तोकडेच निघाले
प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका गोरगरीब विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या कपड्यांपैकी अनेक गणवेश तोकडेच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा कपडे मिळतील याची शाश्वती नसल्याने या मुलांना हे तोकडे कपडे घालून शाळा गाठावी लागत आहे.