कसाबला जिवंत पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा वनवास संपला! राज्य सरकारकडून निधी वितरीत

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या अशोकचक्र सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा वनवास संपला आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुकाराम ओंबळे यांचे त्याच्या जन्मगावी मौजे केडंबे येथे स्मारक बांधण्याचे काम प्रलंबित होते. या स्मारकाच्या बांधकामासाठी आता राज्य सरकारकडून निधी वितरीत करण्यात आला आहे.

अशोकचक्राने सन्मानित हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे त्यांच्या जन्मगावी मौजे केडंबे ता. जावळी जि. सातारा येथे स्मारक उभारण्यासाठी 13 कोटी 46 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापैकी 20 टक्के रक्कम अर्थात 2 कोटी 70 लाख रुपये इतका निधी पहिल्या टप्प्यात वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारने पत्रकद्वारे दिली आहे.