तहव्वूर राणाला हिंदुस्थानच्या हवाली केले जाणार

मुंबईवर झालेल्या ‘26/11’ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर हुसेन राणाच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली. राणा मूळचा पाकिस्तानी असून तो कॅनडाचा नागरिक आहे. कनिष्ठ न्यायालयात कायदेशीर लढाई हरल्यानंतर त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्रत्यार्पण होऊ नये यासाठी अपील करण्याची राणाकडे ही अखेरची कायदेशीर संधी होती, मात्र न्यायालयाने राणाच्या विरोधात निर्णय दिल्याने त्याला हिंदुस्थानच्या स्वाधीन केले जाईल.