जयपूरमध्ये यंदाचा आईफा अवॉर्ड सोहळा 8 ते 9 मार्चला रंगणार आहे. या सोहळ्यात 100 हून अधिक बॉलिवूड स्टार्सची उपस्थित असणार आहे. राजस्थानी कलाकार लोकगीत आणि लोकनृत्य सादर करतील. चित्रपटसृष्टीमध्ये 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गायिका श्रेया घोषाल या सोहळ्याला खास उपस्थित राहणार आहे.
या सोहळ्याला कार्तिक आर्यन आणि करण जोहर होस्ट करणार आहेत. या शोमध्ये शाहरुख खान, माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, कृति सेनन आणि नोरा फतेही नृत्यू सादर करतील. या शोची किंमत 30 हजार रुपये ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे. दीड लाखांचे तिकीट जवळपास 70 टक्के बुक झाले आहेत.