साताऱयात एजन्सीजची अनधिकृत 25 होर्डिंग्ज; 8 होर्डिंग्जवर कारवाई, गुन्हे दाखल करणार

सातारा शहरात वेगवेगळ्या एजन्सीजची 25 अनधिकृत होर्डिंग्ज असल्याचे प्रशासनाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. या होर्डिंग्जकर कारवाईस सुरुवात झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने 8 होर्डिंग्ज कापून काढली आहेत. नोटिसीची मुदत संपल्याने होर्डिंग्ज एजन्सीजनर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

साताऱयात वादळामुळे बऱयाचदा होर्डिंग्ज कोसळून नागरिकांना दुखापत झाली आहे. त्यामुळे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आदेश दिल्यावर अतिक्रमण हटाव विभागाने होर्डिंग्ज एजन्सीजना नोटीस काढून एनओसी तसेच इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट मागितला होता. या नोटिशीची मुदत संपल्यानंतर अतिक्रमण हटाव विभागाने कारवाई सुरू केली आहे. नगरपालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीत शहरात 25 होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. ही होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सातारा पालिकेने सुरू केली आहे. सातारा बसस्थानक परिसर तसेच राजवाडा परिसरातील होर्डिंग्ज काढून ती जप्त करण्यात आले. अतिक्रमण हटाव विभागाने बुधकारी केलेल्या कारवाईत 3 होर्डिंग्ज हटकली आहेत. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम व त्यांच्या टीमने आतापर्यंत 8 होर्डिंग्ज हटवली आहेत.

सातारा शहरातील होर्डिंग्जबाबत संबंधितांना नोटिसा दिल्या होत्या. स्ट्रक्चरल रिपोर्ट सादर न झालेल्या अनधिकृत होर्डिंग्जकर कारकाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत आठ होर्डिंग्ज कापून काढून ती जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल करणार आहोत.

– अभिजीत बापट, मुख्याधिकारी, सातारा पालिका