अल्ट्रा लक्झरी घरांची बंपर विक्री

हिंदुस्थानात 2024 साली 100 ते 200 कोटी रुपये किमतीची 25 अल्ट्रा लक्झरी घरे विकली गेली. साधारण 3650 कोटी रुपये एवढी ही उलाढाल झाली. 2025 च्या पहिल्या दोन महिन्यांतच चार अल्ट्रा-लक्झरी घरे विकली गेली आहेत. त्यांची एपूण किंमत 850 कोटी रुपये आहे. 2023 मध्ये 2259 किमतीची 14 अल्ट्रा लक्झरी घरे विकली गेली होती. 2022 मध्ये 1583 कोटींची दहा घरे विकली गेली. जेएलएल इंडियाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. मागील तीन वर्षांमध्ये मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये 49 अल्ट्रा लक्झरी घरे विकली गेली. त्या प्रत्येक घराची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. यात मुंबईतील घरांची संख्या जास्त आहे. बहुतांशी करार 100 ते 200 कोटी रुपयेदरम्यानचे आहेत. आतापर्यंत अल्ट्रा लक्झरी घरांमध्ये एपूण 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.