इस्रायलच्या हल्ल्यात 25 ठार

इस्रायलने गाझा पट्टीवर रात्रभर केलेल्या हल्ल्यांमध्ये आठ मुले आणि पाच महिलांसह 25 लोक ठार झाले. गेल्या 24 तासांत इस्रायली हल्ल्यात ठार झालेल्या 58 लोकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले, तर 213 जखमी आहेत, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अद्यापही पॅलेस्टिनी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.