25 कोटी जनता दारिद्र्यातून बाहेर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा

देशातील 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून याचा आपल्याला अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर ते राज्यसभेत बोलत होते. देशाच्या विकासात मध्यमवर्गीयांचा मोठा हातभार आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीला त्यांच्यामुळेच चालना मिळाली. त्यांच्या हातात पैसा खेळावा म्हणून 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले, असेही ते म्हणाले. दरम्यान, मोदी यांनी आणीबाणी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावरून पुन्हा काँग्रेसला लक्ष्य केले.

मोदींचे भाषण पूर्णपणे असत्य  – काँग्रेस

एखादा मनुष्य इतिहासात जगून वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची सांगड कशी घालू शकतो याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर टीका केली. मोदींचे भाषण पूर्णपणे असत्य आणि अर्धसत्य होते, असा टोलाही त्यांनी लगावला.