
एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची वाच्यता करू नको अन्यथा ठार मारीन, अशी धमकी देखील त्याने मुलाला दिली. अखेर हे प्रकरणा कळल्यानंतर पोलिसांनी बलात्कार व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला बेडय़ा ठोकल्या. पीडित मुलगा परिसरात खेळत असताना आरोपीने त्याला उचलून नेले. त्याला रेल्वे पटरीजवळील निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर बलात्कार केला. शिवाय मुलाला मारहाण देखील केली. आरोपी हा मूळचा बिहारचा असून तो पीडित मुलाच्या वडिलांसोबत मजुरीचे काम करीत असल्याचे समजते.