
छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून 22 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून स्पह्टक साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून बॉम्ब, जिलेटीनच्या कांडय़ा, डिटोनेटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी, माओवादी फलक आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱयाने सांगितले. या कारवायांमध्ये सुरक्षा कर्मचाऱयांची स्वतंत्र संयुक्त पथके सहभागी होती.