
पाकिस्तानातील कराची येथील मालीर तुरुंगात असलेल्या 22 हिंदुस्थानी मच्छीमारांची सुटका झाली आहे. मालीर तुरुंगाचे अधीक्षक अर्शद शाह यांनी मच्छीमारांना त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सोडण्यात आल्याचे सांगितले. अनवधानाने एकमेकांच्या सागरी सीमेत प्रवेश केल्याप्रकरणी दोन्ही देश नियमितपणे अशा मच्छीमारांना अटक करत असतात. 1 जानेवारी रोजी दोन्ही देशांनी कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण केली. त्यानुसार, पाकिस्तानमध्ये 266 हिंदुस्थानी कैदी होते. यामध्ये 49 नागरी कैदी आणि 217 मच्छीमारांचा समावेश होता.