
अवकाळी पाऊस, सततची नापिकी, उन्हाच्या तडाख्याने पिकांचे नुकसान… यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून राज्यातील पाच जिह्यांमधील तब्बल 21 हजार 219 हून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या 24 वर्षांत मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारच्या आकडेवारीतून समोर आली आहे. जानेवारी 2001 ते जानेवारी 2025 पर्यंतची ही आकडेवारी असून अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिह्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यंदाच्या जानेवारी महिन्यात 80 शेतकऱ्यांनी जीवन संपवले.
n अमरावती – 5395, अकोला – 3,123, यवतमाळ -6,211, बुलडाणा – 4,442 आणि वाशिम जिह्यात 2,048 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.