
जगभरातील मोठय़ा कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात धोरण लागू करण्यात आलेय. यामध्ये टेक कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे. मार्च महिन्यात 21 टेक कंपन्यांनी 8834 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. कर्मचारी कपातीवर लक्ष ठेवणाऱ्या ‘लेऑफ डॉट एफवायआय’ने ही आकडेवारी जारी केली आहे. टेक कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवले होते. फेब्रुवारी महिन्यात 46 कंपन्यांनी 15994 जणांना कामावरून काढले होते. त्यानंतर मार्च महिन्यातही मोठी कपात झालेली आहे. या महिन्यात बंगळुरू येथील ओला कंपनी तब्बल एक हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याच्या विचारात आहे.