
गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांना हिरमोड झाला. आता चाकरमान्यांना बाप्पा पावला असून कोकण रेल्वे प्रशासनातर्फे गणेशोत्सवात सात विशेष गाडय़ांच्या तब्बल 202 फेऱया चालविण्यात येणार आहेत. उद्या, रविवारपासून प्रवाशांना तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे.
सीएसएमटी–सावंतवाडी
1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत गाडी क्र. 01151/01152 च्या 36 फेऱया धावणार आहेत. सीएसएमटी येथून ही गाडी रात्री 12.20 वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी 2.20 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. दुपारी 3.10 वाजता सावंतवाडी येथून सुटून दुसऱया दिवशी पहाटे 4.35 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
सीएसएमटी–रत्नागिरी
1 ते 18 सप्टेंबर दरम्यान गाडी क्र. 01153/01154 च्या 36 फेऱया होतील. सीएसएमटी येथून सकाळी 11.30 वाजता सुटून रात्री 8.10 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरीतून पहाटे 4 वाजता सुटून दुपारी 1.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
एलटीटी–कुडाळ
1 ते 18 सप्टेंबरला गाडी क्र. 01167/01168 च्या 36 फेऱया होतील. ही गाडी एलटीटी येथून रात्री 9 वाजता सुटून दुसऱया दिवशी सकाळी 9.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ येथून सकाळी 12 वाजता सुटून रात्री 12.40 वाजता एलटीटी ला पोहोचेल.
एलटीटी–सावंतवाडी
1 ते 18 सप्टेंबरला गाडी क्र. 01171/01172 च्या 36 फेऱया होतील. एलटीटीवरून गाडी सकाळी 8.20 वाजता सुटून रात्री 9 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. सावंतवाडी येथून रात्री 10.10 वाजता सुटून सकाळी 10.40 वाजता एलटीटीला पोहोचेल.
एलटीटी–कुडाळ
गाडी क्र. 01185/01186 च्या 16 फेऱया 2 ते 18 सप्टेंबरला सोमवार, बुधवार व शनिवारी धावणार आहे. एलटीटी येथून रात्री 12.45 वाजता सुटून सकाळी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ येथून सायंकाळी 4.30 वाजता सुटून पहाटे 4.50 वाजता एलटीटीला पोहोचेल.
एलटीटी–कुडाळ स्पेशल
01165/01166 ही गाडी 3, 10, 17 सप्टेंबरला धावेल. 12.45 वाजता एलटीटी येथून सुटेल आणि सकाळी 12.30 वाजता कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात संध्याकाळी 4 ः 30 वाजता सुटेल आणि मध्यरात्री 4ः50 वाजता एलटीटीला येथे पोहोचेल.
दिवा–चिपळूण मेमू स्पेशल (36 फेऱया)
दिवा-चिपळूण मेमू स्पेशल यंदाही स्पेशल 1 ते 18 सप्टेंबरला धावणार आहे. दिवा येथून सकाळी 7.15 वाजता सुटून दुपारी 2 वाजता चिपळूणला पोहोचेल. तेथून दुपारी 3 वाजता सुटून रात्री 10.50 पोहोचेल.