जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांपैकी 13 हिंदुस्थानातील; दिल्ली सर्वाधिक प्रदूषित तर उत्तर प्रदेशच्या चार शहरांचा समावेश

जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली. या 20 शहरांपैकी 13 शहरे ही हिंदुस्थानातील आहेत. म्हणजेच जगातील निम्म्याहून अधिक शहरे ही हिंदुस्थानातील आहेत. जगातील राजधानीचा दर्जा असलेल्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली अग्रस्थानी आहे, तर हिंदुस्थानातील सर्वाधिक प्रदूषित शहर हे मेघालयाचे बर्नीहाट असल्याचे समोर आले आहे.

स्विस एयर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यू एअरच्या 2024 च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जगाच्या सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत हिंदुस्थानला पाचवे स्थान मिळाले आहे. 2023 मध्ये हिंदुस्थान तिसऱ्या स्थानी होता. दोन स्थानांनी घसरण झाली आहे. याचाच अर्थ देशात प्रदूषणाची पातळी कमी होत असल्याचे दिसत आहे. 2024 मध्ये हिंदुस्थानात 2.7 च्या आयक्यू एअरवर 7 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. 2024 मध्ये 2.0 चा स्तर सरासरी 50.6 मायक्रोग्राम प्रति क्युबिक मीटर होता, तर 2023 मध्ये हा 54.4 मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर होता. जगातील सर्वात टॉप 10 शहरांतसुद्धा हिंदुस्थानच्या 6 शहरांचा समावेश आहे. दिल्लीत लागोपाठ प्रदूषणाचा स्तर उंचावला गेला आहे.

 हिंदुस्थानातील 13 शहरे

  • बर्नीहाट (मेघालय)
  • दिल्ली (दिल्ली)
  • मुल्लांपूर (पंजाब)
  • फरिदाबाद (हरयाणा)
  • लोनी (उत्तर प्रदेश)
  • नवी दिल्ली (दिल्ली)
  • गुरुग्राम (हरयाणा)
  • श्रीगंगानगर (राजस्थान)
  • ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश)
  • भिवाडी (राजस्थान)
  • मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश)
  • हनुमानगढ (राजस्थान)
  • नोएडा (उत्तर प्रदेश)

ओशिनिया सर्वात स्वच्छ

ओशिनिया 2024 मधील जगातील सर्वात हवा स्वच्छ क्षेत्र ठरले आहे. ओशिनियामध्ये 14 देशांचा समावेश होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, पापुआ न्यू गिनी, नौरु, किरिबाती, मायक्रोनेशिया, मार्शल आयलँड्स आदींचा समावेश आहे.

सर्वाधिक प्रदूषित देश

  • चाड
  • बांगलादेश
  • पाकिस्तान
  • कांगो
  • हिंदुस्थान