भाजपच्या खासदारांनीच धुडकावला व्हीप, ONOE विधेयकावेळी मारली 20 जणांनी दांडी

आज संसदेत एक देश एक निवडणूक विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मतं पडली. पण महत्त्वाचे विधेयक सादर होत असताना भाजपच्या 20 खासदारांनी चक्क दांडी मारली होती. त्यामुळे या 20 खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

.

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं एक देश एक निवडणूक विधेयक आज संसदेत सादर करण्यात आलं. पण या विधेयकाच्या मतदानावेळी भाजपचेच 20 खासदार अनुपस्थितीत होते. व्हीप बजावूनही 20 खासदार अनुपस्थित असल्याने भाजप या खासदारांवर कारवाई करण्याची शक्यत आहे. भाजप या खासदारांना नोटीस बजावण्याची शक्यता आहे अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.