विधवा महिलांनी पुन्हा लग्न केल्यास दोन लाख रुपयांची मदत करणार, मध्य प्रदेश सरकारची योजना

एखाद्या विधवा महिलेने पुर्नविवाह करून आपलं नवे आयुष्य सुरु केल्यास दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. तसेच राज्यातील काही भागांत सरकारने दारूबंदीही केली आहे.

आज मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. राज्यातील 17 शहर आणि ग्रामपंचायत भागात दारूबंदी करण्यात आली.

राज्यात कल्याणी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार कुठलीही विधवा महिला पुन्हा लग्न करून आपले नवे आयुष्य सुरू करणार असेल तर त्यांना कल्याणी योजनेच्या माध्यमातून या महिलांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.