महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 2.67 कोटींचे सोने जप्त केले. सोने तस्करीप्रकरणी दोघांना डीआरआयने अटक केली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली गेली आहे. विमानतळावरील ग्राहक सेवा पुरवणाऱया कंपनीचा कर्मचारी आणि ग्राऊंड स्टाफ हे सोने तस्करीत असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआयच्या अधिकाऱयाने विमानतळाच्या एक्झिट गेटवर महिला कर्मचारीला अडवले. महिलेची झडती घेतली. तिच्याकडून 3350 ग्रॅम पेस्ट स्वरूपातील सोने असलेली पाकिटे आढळून आली. तिची डीआरआयच्या अधिकाऱयाने कसून चौकशी केली. त्यानंतर डीआरआयने ग्राऊंड हँडलिंग कर्मचाऱयाला ताब्यात घेतले. त्याने विमानाच्या टाकाऊ कार्टमधून तस्करी केलेले सोने मिळवले होते. महिला तिच्या एअरोड्रोम एंट्री परमिट (AEP) चा वापर करून ती विमानतळाबाहेर सोने नेऊन त्याची तस्करी करणार असल्याचे तपासात समोर आले आहे. सोने तस्करीप्रकरणी दोघांचा जबाब नोंदवून दोघांना अटक केली.