दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये 199 पदांसाठी भरती

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये 199 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 10 एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून 9 मे 2025 ही अर्ज भरण्याची शेवटची डेडलाइन आहे. या भरतीमध्ये प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकसह अन्य काही पदांवर भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराला पगार एक लाख ते दोन लाखांपर्यंत दिला जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती aiimsexams.ac.in वर देण्यात आली आहे. ़