जगभर फिरण्याची आवड असलेल्या एका तरुणीने वयाच्या अवघ्या 19 वर्षांत 90 देशांत भ्रमंती केली आहे. सोफिया ली असे या तरुणीचे नाव असून ती इन्स्टाग्रामवर कंटेट क्रिएटर आहे. सोफियाने आपल्या 6 आवडत्या देशांची यादीसुद्धा शेअर केली आहे. यात हिंदुस्थान पहिल्या स्थानावर, थायलंड दुसऱ्या तर जॉर्जिया, कोस्टारिका, फ्रान्स, तंझानिया या देशांत प्रवास करणे आवडते असे म्हटले आहे. सोफियाच्या या व्हिडीओला 3 लाखांहून जास्त ह्यूज मिळाले आहेत. हिंदुस्थानला पहिल्या स्थानावर ठेवल्याने सोफियाचे अनेक युजर्संनी कौतुक केले आहे.
View this post on Instagram