बापरे! तरुणीच्या डोक्यातून काढल्या 77 सुया

उपचाराच्या नावाखाली एका तांत्रिकाने 19 वर्षांच्या मुलीवर जादूटोणा केल्याची धक्कादायक घटना ओदिशातील बालंगीर जिह्यात येथे उघडकीस आली आहे. मुलीने डोकेदुखीची तक्रार केल्यानंतर कुटुंबिय तिला रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. डॉक्टरांनी या तरुणीच्या डोक्यातून तब्बल 77 सुया काढल्या. या तरुणीच्या डोक्याचे सिटीस्कॅन करण्यात आले. यात मुलीच्या डोक्यात सुया असल्याचे समोर आले.  बुर्ला येथील सुरेंद्र साई इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च येथील डॉक्टरांनी मुलीच्या डोक्यातून पहिल्या दिवशी 70 सूया काढल्या. त्याच्या एका दिवसानंतर न्यूरोसर्जन टीमने फॉलोअप शस्त्रक्रिया केली आणि आणखी सात सुया काढण्यात यळ मिळवले.