दे धक्का! रिक्षात बसवले 19 प्रवासी

एका रिक्षामध्ये चक्क 19 प्रवासी बसवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील झासी येथे उघडकीस आली आहे. या ऑटो चालकाने वाहतूक नियमांना हरताळ फासले आहे. एका ऑटोत एवढे प्रवासी बसल्याचे पाहून पोलीसही चक्रावले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी ऑटोतून एकामागून एक खाली उतरताना दिसत आहेत. हे सर्व मोजल्यानंतर त्यांची संख्या 19 आहे. झाशी पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिजन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.