राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे 15 ते 30 ऑक्टोबरदरम्यान राज्य आणि पेंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी अशी एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
राज्य पोलीस विभागाकडून 75 कोटी रुपये, प्राप्तिकर विभागाकडून 60 कोटी रुपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ अॅपवर तक्रार करता येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे.