हापूस आंबा उत्पादकांनी मिळवले 1 हजार 845 जीआय टॅग

देश-विदेशात ख्याती कमावलेल्या कोकणातील हापूस आंब्याला जीआय कवच मिळाले आहे. त्यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार असून हापूसच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार आहे. हापूस आंब्याच्या उत्पादकांनी 1 हजार 845 जीआय टॅग मिळवले आहेत. देशात पहिल्यांदाच एका उत्पादनासाठी एवढय़ा प्रमाणावर जीआय टॅग मिळाले आहेत. हापूस आंब्याचा जीआय टॅग सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱया फळांसाठी राखीव आहे. चव आणि रंगांसाठी ओळखल्या जाणाऱया आंब्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही आंब्यांना हापूस टॅग वापरण्याची परवानगी नाही, अशी माहिती हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघाचे सचिव मुपुंद जोशी यांनी दिली.