
18 वर्षांच्या तरुणीला गर्भपात करायचा आहे. यासाठी तिने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पीडिता 27 आठवडय़ांची गरोदर आहे. तिला गर्भपात करायचा आहे. त्यामुळे तिची तातडीने वैद्यकीय चाचणी करायला हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जे.जे. रुग्णालयाने तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करावे. या पथकाने पीडितेची वैद्यकीय चाचणी करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.