
मुंबईसह महाराष्ट्राला सध्या उन्हाचे चटके बसत असले तरी या वर्षी पावसाळा मात्र दमदार होणार असून समुद्राला 18 दिवस मोठे उधाण येणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यांत समुद्रात येणाऱया उधाणामुळे साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून मुंबईकरांनी खबरदारी म्हणून चौपाटय़ांवर गर्दी करू नये आणि योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे.
पावसाळ्यात दरवर्षी समुद्राला उधाण येते. या वेळी मोठय़ा उंचीच्या लाटांमुळे चौपाटय़ांवर फिरायला येणाऱया पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होतो. या वर्षी पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. समुद्राला उधाण असताना उंच लाटा किनाऱयावर आदळत असतात. साधारणतः साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांपासून धोका संभवू शकतो. समुद्राला भरती असताना त्याच वेळी अतिवृष्टी झाल्यास पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात तुंबते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकर व पर्यटकांनी किनाऱयावर जाण्याचे टाळावे, गेल्यास योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येते.
जूनमधील उधाणाचे दिवस
दिनांक वेळ लाट उंची
24 11.15 वा. 4.59 मीटर
25 12.05 वा. 4.71 मीटर
26 12.55 वा. 4.75 मीटर
27 13.40 वा. 4.73 मीटर
28 14.26 वा. 4.64 मीटर
जुलैमधील उधाणाचे दिवस
24 11.57 वा. 4.57 मीटर
25 12.40 वा. 4.66 मीटर
26 13.20 वा. 4.67 मीटर
27 13.56 वा. 4.60 मीटर
ऑगस्टमधील उधाणाचे दिवस
10 12.47 वा. 4.50 मीटर
11 13.19 वा. 4.58 मीटर
12 13.52 वा. 4.58 मीटर
23 12.16 वा. 4.54 मीटर
24 12.48 वा. 4.53 मीटर
सप्टेंबरमधील उधाणाचे दिवस
8 12.10 वा. 4.57 मीटर
9 12.41 वा. 4.63 मीटर
10 1.15 वा. 4.59 मीटर
11 1.58 वा. 4.59 मीटर