महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मात्र राज्यातील जनता मतदानाबाबत उदासीन असल्याचे चित्र पहायला मिळाले. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान झाले तर झारखंडमध्ये 31.37 टक्के मतदान झाले.
गडचिरोलीत सर्वाधिक मतदान
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक 30.00 टक्के, तर नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी 13.67 टक्के मतदान झाले.
मुंबई शहरात 15.78 टक्के मतदान
निवडणूक मंडळाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात 15.78 टक्के, मुंबई उपनगरात 17.99 टक्के, नागपूर 18.90 टक्के, ठाणे 16.63 टक्के, औरंगाबाद 17.45 टक्के, पुणे 15.64 टक्के, नाशिक 18.71 टक्के, सातारा 18.72 टक्के, कोल्हापूर 20.59 टक्के, धुळे 20.11 टक्के, पालघर 19.40 टक्के, रत्नागिरी 22.93 टक्के आणि लातूर 18.55 टक्के मतदान झाले.
सिंधुदुर्गमध्ये 20.91 टक्के, वर्ध्यात 18.86 टक्के, उस्मानाबादमध्ये 17.07 टक्के, वाशिममध्ये 16.22 टक्के, यवतमाळमध्ये 19.38 टक्के, सोलापूरमध्ये 15.64 टक्के, अहमदनगरमध्ये 18.24 टक्के, सांगलीमध्ये 18.55 टक्के, अकोला 16.35 टक्के, अमरावती 17.45 टक्के, बीड 17.41 टक्के, भंडारा 19.44 टक्के, बुलढाणा 19.23 टक्के, चंद्रपूर 21.50 टक्के, गोंदिया 23.32 टक्के, गोंदिया 23.32 टक्के, हिंगोली 19.20 टक्के, जालना 21.29 टक्के, नंदुरबार 21.60 टक्के, परभणी 18.49 टक्के आणि रायगड 20.40 टक्के, नांदेडमध्ये 12.59 टक्के मतदान झाले आहे.
झारखंडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 31.37 टक्के मतदान
विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झारखंडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 31.37 टक्के मतदान झाले. यात पाकूर जिल्ह्यात सर्वाधिक 35.15 टक्के मतदान झाले, तर बोकारोमध्ये सर्वात कमी 27.72 टक्के मतदान झाले.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, देवघरमध्ये 32.84 टक्के, धनबादमध्ये 28.02 टक्के, दुमकामध्ये 33.05 टक्के, गिरीडीहमध्ये 31.56 टक्के, हजारीबागमध्ये 31.04 टक्के, जामतारामध्ये 33.78 टक्के, रामगढमध्ये 33.45 टक्के, रांचीमध्ये 34.75 टक्के आणि साहेबगंजमध्ये 30.90 टक्के मतदान झाले.
अनेक जागांवर पोटनिवडणूकही सुरू असल्याने, सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 17.69 टक्के मतदान झाले, तर केरळमधील पलक्कडमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 24.95 टक्के मतदान झाले.
पंजाबच्या पोटनिवडणुकीत, सकाळी 11 वाजेपर्यंत, गिद्दरबाहासाठी 20.91 टक्के, डेरा बाबा नानकमध्ये 25.50 टक्के, बर्नालामध्ये 16.30 टक्के आणि चब्बेवालमध्ये 12.71 टक्के मतदान झाले.
उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत मीरापूरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.18 टक्के, माझवानमध्ये 20.41 टक्के, खैर 19.18 टक्के, फुलपूरमध्ये 17.68 टक्के, कुंडरकीमध्ये 28.54 टक्के, करहालमध्ये 20.71 टक्के, कतेहरीमध्ये 24.28 टक्के, गाझियाबाद 12.87 टक्के आणि सिषमाऊ 15.91 टक्के मतदान झाले आहे.