मध्य आशियातून 170 पाकिस्तानी हद्दपार

मध्य आशियातील  सौदी अरेबिया, यूएई आणि इतर देशांमधून गेल्या दोन दिवसांत तब्बल 170 पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाने परत पाठवलेल्या 94 पाकिस्तानी नागरिकांमध्ये भिकारी, अंमली पदार्थ तस्कर, बेकायदेशीर रित्या राहणारे, स्पॉन्सरशिवाय राहणारे, नोकरी सोडून पळालेले आणि पंत्राट कराराचे उल्लंघन केलेल्या नागरिकांचा समावेश आहे. अन्य देशांतूनही पाकिस्तानी पाठवले आहेत.